Ad will apear here
Next
चक्रीवादळामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
सौजन्य : स्कायमेटवेदर

मुंबई :
अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी चार नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीवच्या मुख्य सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. 

अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून, या चक्रीवादळाचा जास्त धोका गुजरातला आहे. राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या. ‘आठ नोव्हेंबरपर्यंत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा,’ असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी केले आहे.

चक्रीवादळामुळे पालघर, ठाण्यासह कोकणात काही ठिकाणी, तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून, आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्रकिनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही या वेळी सांगण्यात आले.

बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZYRCG
Similar Posts
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे
‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करणे हे सरकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य’ ठाणे : ‘तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून सरकारी कामांमध्ये पारदर्शकता ठेवून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जलद गतीने देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासकीय सेवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख काम करण्याचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ ठेवून
सावरकर सेवा संस्थेतर्फे ठाण्यात २८ ऑक्टोबरला ‘दिवाळी पहाट’ ठाणे : ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा संस्थेतर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही ‘दिवाळी पहाट’ या दिमाखदार सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रिया सुलभ ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांत असणाऱ्या दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रावर सुलभ पद्धतीने जाण्यासाठी मोफत आणि घरपोच वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी १९ ऑक्टोबर रोजी पाहणी करून आढावा घेतला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language